Home Breaking News ७ हजार रुपयांची मागणी करणारा भूमी अभिलेख कार्यालय, आरमोरी भूकरमापक सापडला लाचलुचपत...

७ हजार रुपयांची मागणी करणारा भूमी अभिलेख कार्यालय, आरमोरी भूकरमापक सापडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

151

७ हजार रुपयांची मागणी करणारा भूमी अभिलेख कार्यालय, आरमोरी भूकरमापक सापडला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 

वृत्तवाणी गडचिरोली /आरमोरी (दि,२७ जून)

 

तक्रारदार यांना त्यांच्या वडीलोपार्जीत शेत जमीनीच्या पोट हिस्साची मोजणी करुन त्यातील एक हेक्टर जमीन मॅचअप करून “क” शिट तयार करुन देण्याचे कामाकरीता आरोपी श्री. खुशाल मुखरु राखडे, भुकरमापक, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय आरमोरी यांनी ७,००० रुपयांची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केल्यावरुन वर नमूद कलमान्वये पोलीस स्टेशन आरमोरी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अनव्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

 

सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात शिवाजी राठोड, लीश्रीधर भोसले, नथ्थु धोटे, राजु पदमगिरीवार, किशोर जौंजारकर, स्वप्निल बांबोळे, किशोर ठाकुर, संदिप उडाण, संदीप घोरमोडे,

अनिल अंगडवार यांनी पार पाडली.

Don`t copy text!