*जनकल्याणकारी योजना जलदगतीने राबवा*
*आ. डॉ. देवरावजी होळी*
*सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न*
*दि. 28/06/2023 गडचिरोली*
गडचिरोली: समाजातील तळागाळातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला मदत करणाऱ्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची विभागणी करून द्यावी. जेणेकरून जनकल्याणाच्या योजना राबविण्याच्या कामाला गती येऊन वेळेत उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा सूचना यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना करून विविध योजनांचा आढावा घेतला.
समान कल्याण विभागाच्या वतीने एस. टी, एस. सी. एन टी. प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाते. त्यात पारदर्शकता येण्यासाठी घरकुल योजनेतील निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना विनाविलंब लाभ द्यावा, अशा सूचना यावेळी केल्या. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या योजनानिहाय अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक आयुक्त गडचिरोली सचिन मडावी यांच्यासह विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.





