*२ जुलै ला गडचिरोलीत वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*महा जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन*
*दिनांक २९ जून २०२३ गडचिरोली*
*मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त संपुर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने गडचिरोली येथे २ जुलैला महाराजा लॉन धानोरा रोड गडचिरोली येथे दुपारी ४ वाजता वनमंत्री मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सभेचे प्रमुख तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.*
*या सभेला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे , आमदार कृष्णाजी गजबे, विधान परीषदेचे आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, माजी मंत्री राजे अंबरीशराव आत्राम, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरड्डीवार, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.*
*तरी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपावरील प्रेम व्यक्त करावे असे आवाहन आ. डॉ देवरावजी होळी यांनी केले आहे.*





