*एक हात मदतीचा – होप फाऊंडेशन सिरोंचा च्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा , कमके येथे विद्यांर्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण*

87

*एक हात मदतीचा – होप फाऊंडेशन सिरोंचा च्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा , कमके येथे विद्यांर्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण*

एटापल्ली : जि.प.प्राथमिक शाळा , कमके , या अतिदूर्गम , संवेदनशील , आदीवासीबहुल लोकवस्ती असलेल्या शाळेतील गरजु विद्यांर्थ्यांना होप फाऊंडेशन सिरोंचा तर्फे शैक्षणिक साहीत्य नोटबुक , पाटी , पेन्शील , कंपास , स्केचपेन , पेन ई.साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रामुभाऊ झूरे, उपाध्यक्षा सौ.चंद्रकला कुमोटी , ग्रामपंचायत सदस्य श्री .महेश कोवासे , पो.पाटील श्री.दुलसा पा.झुरे , शाळा.व्य.समितीचे सदस्य श्री.गणेश कोवासे , रावजी झुरे , सैनु पदा , सविता कोवासे , शिल्पा पुंगाटी मुख्याध्यापक श्री .अविनाश बारसागडे , सहा.शिक्षक श्री.अतुल कुनघाडकर , भिमराव सहारे आदी मान्यवर उपस्थीत होते. सदर उपक्रमासाठी नगरपंचायत चामोर्शी चे नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार आणि चामोर्शी चे दुर्गा ट्रेडर्स चे संचालक रमेश चकोर यांनी सहकार्य केले.

शाळेतील गरजु विद्यांर्थ्यांना शै.साहीत्य वाटप केल्याबद्दल मुख्याध्यापक श्री.अविनाश बारसागडे यांनी होप फाऊंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष श्री.नागेश मादेशी , चामोर्शी च्या नगराध्यक्षा मा.सौ.जयश्रीताई वायलालवार , दुर्गा ट्रेडर्स चामोर्शी चे श्री .रमेशभाऊ चकोर यांचे शाळेच्या वतीने आभार मानले.