Home Breaking News *दारूची ओली पार्टी करणारे बेळगावचे क्षेत्रसहायक आणि वनरक्षक निलंबित

*दारूची ओली पार्टी करणारे बेळगावचे क्षेत्रसहायक आणि वनरक्षक निलंबित

82

*दारूची ओली पार्टी करणारे बेळगावचे क्षेत्रसहायक आणि वनरक्षक निलंबित*

दारूची ओली पार्टी करणे पडले महागात

 

 

देसाईगंज ता. १३ : देसाईगंज वनविभागातील बेळगाव वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाने कार्यालयीन वेळेत ओली पार्टी केल्याप्रकरणी उपवनसरंक्षकांनी त्यांना निलंबित केले आहे. अजय गहाणे असे निलंबित क्षेत्र सहायकाचे, तर बबलू वाघाडे असे वनरक्षकाचे नाव आहे..

 

काही दिवसांपूर्वी क्षेत्र सहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे यांनी कार्यालयीन वेळेत मोहगाव येथील रोपवाटिकेत ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. त्याच वेळी काही नागरिक रोपवाटिकेत गेले असता दोघेही त्यांना मद्यधुंद अवस्थेत आढळून आले होते. नागरिकांनी त्यांचे चित्रीकरण करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते. चौकशीअंती दोघांनाही निलंबित केल्याची माहिती देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.

Don`t copy text!