बार्शीत व्हॉइस ऑफ मिडियाचे पहिले डिजिटल मीडिया पत्रकार संमेलन

151

बार्शीत व्हॉइस ऑफ मिडियाचे पहिले डिजिटल मीडिया पत्रकार संमेलन

 

राज्यातून अनेक पत्रकारांची हजेरी.

 

अनेक विषयावर होणार परिसंवाद आणि विचारमंथन

 

सोलापूर (प्रतिनिधी) व्हॉइस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने येत्या रविवारी दि.23 रोजी बार्शी येथील वीरशैव लिंगायत बोर्डिंगमध्ये राज्यस्तरीय पहिले डिजिटल मीडिया पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी राज्यातून अनेक पत्रकारांची हजेरी लागणार आहे.

रविवारी सकाळी दहा वाजता या राज्यस्तरीय डिजिटल मीडिया पत्रकार संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. या संमेलनाध्यक्षपदी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची निवड करण्यात आली आहे. तर स्वागताध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभाग प्रमुख रवींद्र चिंचोलकर हे असणार आहेत.

संमेलनासाठी व्हाॅईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के , खा. ओमराजे निंबाळकर, आ. राजेंद्र राऊत ,माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले ,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच कार्यक्रमाला तहसीलदार  एफ आर शेख ,उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, व्हाॅईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड , प्रदेश उपाध्यक्ष संजय मालानी,व्हाॅईस ऑफ मिडीया शिक्षण कमिटी चे प्रदेशाध्यक्ष चेतन कात्रे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले हे ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सत्रानंतर पहिल्या सत्रात सकाळी 11 वाजता एबीपी माझाचे डिजिटल एडिटर मेघराज पाटील यांचे ‘डिजिटल मीडिया काल आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 12.30 वाजता न्यूज 18 लोकमतचे तथा व्हाईस ऑफ मीडिया टीव्ही विंगचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांचे ‘डिजिटल माध्यमे तारक की मारक’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये दुपारी 3 वाजता विकास अध्ययन केंद्राच्या सामाजिक संशोधक रेणुका कड यांचे ‘आंतरराष्ट्रीय स्थिती आणि डिजिटल मीडिया समोरील आव्हाने’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होणार आहे.दुपारी 4 वाजता डिजिटल मीडिया अभ्यासक देवनाथ गंडाटे यांचे ‘डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकार’ या विषयावर प्रबोधन होणार आहे.

तरी राज्यातील पत्रकार बांधवांनी 21 जुलै पूर्वी संदीप मठपती 9422380501,प्रदिप माळी 9689264436, हर्षद लोहार 7083278584,शाम थोरात 70206 17605, विजय शिंगाडे,7620035435,सागर गरड 7057075859 यांच्याकडे नाव नोंदणी करूण घ्यावी असे आवाहन व्हाॅईस ऑफ मीडिया च्या वतीने करण्यात आले आहे.