*इर्शालवाडि दरड दुर्घटनेत शिवसेनेचे मदतीचे हात पुढे सरसावले!*
गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे यांचे पुढाकार
*जिल्ह्यातील शिवसैनिकाना समाधान*
*गडचिरोली:*- राज्यातील खालापुर येथील इर्शालवाडि दरड दुर्घटनेत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मदतीचा हात पुढे केले असून मदत पोहचविन्यासाठी पुढे सरसावले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाड़े व महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ, शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख डॉ.परेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे यांनी रविवार 23 जुलै रोजी जीवनावश्यक साहित्याचे मदत करूण पीड़ित कुटुंबियाना हिंम्मत व धीर दिले. संकट व आपत्ति कालीन वेळेत शिवसेना पक्ष माणूसकीचा धर्म टिकवून मदतीसाठी तत्पर व सज्ज असतो म्हणून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे )अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व जिल्ह्यातील शिवसैनिकानी समाधान व्यक्त करून पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
मानव सेवा हिच ईश्वर सेवा असल्याने शिव आरोग्य सेना व पनवेल रायगड जिल्ह्याच्या वतीने कपडे, चादर, साड्या, टॉवेल, सुके खाद्य पदार्थ, ओषधे, बिस्किट्स, धान्य, तेल, साबुन व अन्य संसारोपयोगी वस्तु पीड़ित कुटुंबियाना वितरित करण्यात आले व सोबतच वैद्यकिय चम्मूकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आले.
यासाठी तेथील शिव आरोग्य सेनेने, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भरिव मदत केले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मदतीसाठी पुढे सरसावल्याने आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना व मत जिल्ह्यातील शिवसैनिकानी व्यक्त केले आहे.




