*आलदंडी नदीवरील पुलाची दुरुस्ती होईपर्यंत जड वाहतूक बंद करा अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडणार*
सुरजागड लोहखानीतील खनिज काढण्याचे काम जोमात सुरू आहे. या प्रकल्पामुळे अनेकांना रोजगार मिळाला असला तरी पहाडी वरील खनिज वाहतूक करण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जातो. सुरजागड लोहखनिज मार्गावरील आलदंडीचा पूल कमजोर आहे. जड वाहनांमुळे तो तुटून पडण्याची दाट शक्यता आहे तसे झाल्यास सर्वांनाच अडचणीचे होईल. तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर हा आलदंडी पूल स्थित आहे. पावसाळ्यात पुरामुळे हा मार्ग काही काळ बंद असतो. आणि पुरामुळे पुलाची दशा आणखीच वाईट झाली आहे. सुरजागड वरून खनिजाच्या शेकडो अवजड वाहनांचा एटापल्ली ते सुरजागड असा प्रवास सुरू असतो. अशा स्थितीत आलदंडी पूल तुटून पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे झाल्यास याचा फटका या मार्गावर असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थांनाही बसणार आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. तेव्हापर्यंत जड वाहतूक बंद करण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
याप्रसंगी मनीष दुर्ग शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी, नामदेव हिचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, सुजल वाघमारे युवासेना उपतालुका अधिकारी, दल्लू पुसली शिवसेना उपतालुकाप्रमुख, दीपक दत्ता तालुका समन्वयक, तेजस भाऊ गुजलवार शिवसेना शाखाप्रमुख आदी बहुसंख्येने उपस्थित होते.



