*गडचिरोली येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश*
*तलाठीचा जागा कमी झाल्याने युवक उतरले रस्त्यावर*
गडचिरोली:- आज दि २७/०७/२०२३ रोजी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद व व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
तलाठी पदभरतीची पेसा अंतर्गत काढण्यात आलेली मुळ जाहिरात हि पूर्वरत करण्यात यावी, बिगर पेसा अंतर्गत येत असलेल्या अनुसूचित जमातीसाठी जागांचा समावेश करण्यात यावा, पेसा अंतर्गत जागा वगळून ओबीसी तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थांसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावे, मागणीसह इतर मागण्यांना धरून आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा हा मुळात आदिवासी जिल्हा असुन आदिवासी समाज हा कायम दुर्लक्षित व नौकऱ्यापासुन वंचित राहिलेला समुह आहे. व पेसा या कायद्यामुळे विवीध संधी प्राप्त होत आहेत. आणि आता यात महत्वाचे म्हणजे जिल्हातील तिन्ही आमदार व खासदार असून सुद्धा पेसा कायद्याला विरोध करत आदिवासी व गैरआदिवासी असा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. व आदिवासींच्या विवीध संध्यांवर गदा आणू पाहत आहेत. जिल्ह्यातील तलाठी पदभरती पेसा अंतर्गत येणाऱ्या जागा कमी करण्यासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी जबाबदार आहेत तसेच खासदार अशोक नेते व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे निष्क्रिय असल्याचा आरोप युवकांनी केला आहे.




