*आमदार डॉक्टर देवरावजी होळी शेतकऱ्यांच्या बांधावर*
*कुरूड येथील शेतावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या*
*पी एम किसान सन्मान निधीबाबत जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या*
*पिक विम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमाबाबत केले मार्गदर्शन*
*दिनांक ३१ जुलै २०२३ गडचिरोली*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना अशा विविध समस्या जाणून घेतल्या*
*प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून तालुक्यातील काही शेतकरी वगळण्यात आले आहेत. अजूनही गरजू शेतकऱ्यांचा त्यात समावेश न करण्यात आल्याने या शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे या संदर्भात तक्रार नोंदवली. त्यानंतर आमदार महोदयांनी लगेच तहसीलदारांना सूचना देऊन यासंदर्भात लोकांना न्याय देण्याचे निर्देश दिले.*





