*एटापल्ली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव यांच्या शेतीचे नुकसान तसेच घरांची पडझड झालेल्यांचे पंचनामे करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात आले*
एटापल्ली:- सतत मुसळधार पावसाने एटापल्ली तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी अन्नदाता यांचे धानपरे रोवणी केलेले अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले तसेच तालुक्यातील काही लोकांच्या घरांमध्ये पूराच पाणी घुसल्यामुळे आणि वादळी वाऱ्याने घर सुद्धा पडले आहेत. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्यावतीने शासनाला विनंती आहे कि पुराच्या पाण्याने तसेच वादळी वाऱ्याने पडझड झालेल्या लोकांचे तसेच शेतकरी बांधवांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले. यावेळेस उपस्थित श्री रियाज शेख शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा, मनीष दुर्गे शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख, अक्षय पुंगाटी युवासेना तालुका अधिकारी, नामदेव हीचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, सुजल वाघमारे युवासेना उपतालुका अधिकारी, आयान पठाण युवा शहर अधिकारी अहेरी तसेच कार्यकर्ते आदी सर्व उपस्थित होते.



