स्तनपान सप्ताह निमित्त “स्तनपानाचे महत्व ” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

73

स्तनपान सप्ताह निमित्त “स्तनपानाचे महत्व ” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम

आज दिनांक 6/8/2023ला होप फॉउंडेशन सिरोंचा, अंगणवाडी केंद्र क्रमांक 2, उपकेंद्र नवेगाव माल, यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 इथे स्तनदा मातेला स्तनपान आणि त्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून होप फॉउंडेशन सिरोंचा चे अध्यक्ष नागेश मादेशी, नवेगाव माल येथील आरोग्य सेविका एस. के. मेकलवार,आशा कार्यकर्ती सविता बांगरे, अंगणवाडी सेविका सुरेखा चौधरी, स्वयंसेवक पंकज डायकी, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे आरोग्य मित्र महेश बांगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होप फॉउंडेशन सिरोंचाचे स्वयंसेवक पंकज डायकी तर आभार प्रदर्शन आरोग्य मित्र महेश बांगरे यांनी केले.

सदर कार्यक्रमाला 9 स्तनदा माता उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आणि गावातील महिला सहकार्य केले.