Home Breaking News *अहेरी तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताहात* *419 विविध दाखल्यांचे वितरण*

*अहेरी तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताहात* *419 विविध दाखल्यांचे वितरण*

89

*अहेरी तहसील कार्यालयाकडून महसूल सप्ताहात*

*419 विविध दाखल्यांचे वितरण*

 *अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा समारोप*

गडचिरोली,(जिमाका)दि.08: महसूल विभागाकडून देण्यात येणा-या आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनेबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना लाभ घेता यावा, तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी अहेरी तहसील कार्यालय येथे विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रमांतर्गत महसूल सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहादरम्याने एकूण 419 दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे.

महसूल सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, तर विशेष अतिथी म्हणून तहसीलदार फारुख शेख, तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, मुख्याधिकारी श्री. दाते, सहा.गट विकास अधिकारी श्री. राऊत उपस्थित होते.

महसूल सप्ताहातील 7 दिवसाच्या कार्यक्रमात महसूल दिन, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र 263, जात प्रमाणपत्र 15, नॉन क्रिमीलेयर 2, अधिवास प्रमाणपत्र 23, 30% महिला आरक्षण प्रमाणपत्र 2, शेतकरी दाखले 6, शिधापत्रिका 15,आर्थिकदृष्ट्या मागास असलेबाबत प्रमाणपत्र 7, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी योजने अंतर्गत 33 तसेच मतदार नोंदनी फार्म नमूना-6 40 विद्यार्थ्याना व नागरिकांना वितरीत करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त 13 लाभार्थ्यांना रुपये 6 लक्ष 85 हजार रक्कमेचे धनादेश वितरण करण्यात आले.

महसूल सप्ताहात महसूल कर्मचारी व नागरीक यांच्याकरीता तलाठी स्तरावर वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजना, रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा, नैसर्गीक आपत्ती, गौन खनिज, महसूल वसूली या योजनेविषयी माहिती देण्यात आली. क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालत घेण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन एकनाथ चांदेकर यांनी तर आभार विनोद दहागांवकर यांनी मानले. यावेळी नायब तहसीलदार सैय्यद , कल्पना सुरपाम, मंडळ अधिकारी मोरेश्वर श्रीरामे, दर्शना कुळमेथे, एकनाथ चांदेकर तसेच तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक तथा समस्त् तलाठी, कोतवाल, कर्मचारी, नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते.

००००००

Don`t copy text!