Home Breaking News *चला वृत्तपत्रे वाचूया..!!* *लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

*चला वृत्तपत्रे वाचूया..!!* *लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

97

*चला वृत्तपत्रे वाचूया..!!*

*लॉयन्स क्लब गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम*

 

लॉयन्स क्लब गडचिरोली द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक शाळा सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी “चला वृत्तपत्रे वाचूया” उपक्रम सुरू करण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी,मराठी आणि इंग्रजी भाषेतील दैनिक वृत्तपत्रे मोफत पुरविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी व जगात,देशात, राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात व आपल्या गावात कोणत्या घडामोडी घडत आहेत याची विद्यार्थांना जाण असावी हा या उपक्रमा मागचा हेतू आहे.या उपक्रमाच्या प्रमुख म्हणून लॉ.संध्या चिलमवार आहेत.

या उपक्रमाचा छोटेखानी उद्घाटन सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .यावेळी लॉयन्स क्लब गडचिरोलीचे अध्यक्ष लॉ.सतीश पवार,सचिव लॉ.किशोर चिलमवार, कोषाध्यक्ष लॉ.नितीन चंबुलवार,लॉ.शांतीलाल सेता, लॉ.भुजंगराव हिरे,लॉ.नादिरभाई भामानी,लॉ.प्रवीण मिरेगे,लॉ.मदतभाई जीवणी,लॉ.परवीन भामानी,पदवीधर शिक्षिका कविता खोब्रागडे सहा.शिक्षिका श्रीमती रेखा बोबाटे,श्रीमती सुजाता शेंडे, श्रीमती.वंदना मडावी , सहा.शिक्षक अनिल खेकारे आदी मान्यवर उपस्थिती होते.

या स्तुत्य उपक्रमासाठी शाळेची निवड केल्याबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती मंगला रामटेके यांनी लॉयन्स क्लब चे आभार मानले.कार्यक्रमाचे संचालन व आभार लॉ.संध्या चिलमवार यांनी केले.

Don`t copy text!