*ग्रामपंचायत आष्टी ने बांधलेल्या गाळे बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारात जिल्हा परिषद स्तरावरून झालेल्या चौकशी अहवाला नुसार दोषीवर कार्यवाही करा – राहुल भगवान डांगे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष आष्टी*
मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद,गडचिरोली यांच्याकडे निवेदनातून मागणी
*अन्यथा न्यायालयात दाद मागणार – राहुल डांगे*
गडचिरोली (आष्टी): चौकशी अहवाल पत्र जावक क्रमांक/ पंसआ / पंचा/ स्था-1 / चौकशी 455/2023 R. 24/04/2023 नूसार राहुल भगवान डांगे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष आष्टी. यांनी आष्टी ग्रामपंचायत येथील झालेल्या गाळे बांधकाम भ्रष्टाचार संदर्भात या बांधकामाची आपल्या जिल्हा परिषद स्तरावरून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या मागणी नुसार मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या चौकशी समितीने आष्टी ग्रामपंचायत येथील गाळे बांधकामाची चौकशी करून अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दि. 24-04-2023 ला सादर केला. त्या अहवाला नुसार चामोर्शी पंचायत समिती कार्यालय. शाखा अभियंता, चामोर्शी,तत्कालीन ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांना दोषी ठरविण्यात आले.
तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी स्तरावरून एक चौकशी समिती नेमली होती परंतु त्या समितीने दोषींना अभय देण्याचे काम केले आहे.
तसेच या चौकशी समितीला पण दोषी ठरविण्यात यावे.
चौकशी अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तीन ते चार महिने सादर होऊन हि दोषीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

करीता आपण लक्ष देऊन भ्रष्टाचारात लिप्त अधिकान्यांवर कार्यवाही करण्यात यावी. दि.१०/१०/ २०२३ पर्यंत योग्य कार्यवाही न केल्यास मला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल असे राहुल डांगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे



