जिल्ह्यातील तीन ही आमदार निवडून आणणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

127

जिल्ह्यातील तीन ही आमदार निवडून आणणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 

 

गडचिरोली दि. १३ – गडचिरोली जिल्हयातील विधानसभेचे तीनही आमदार मी महाविकास आघाडी च्या माध्यमातून निवडून आणणार असा निर्धार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आज गडचिरोली येथे आयोजीत सत्कार समारंभात व्यक्त केला.

 

यावेळी बोलतांना श्री वडेट्टीवार म्हणाले की, सद्या राज्यात येडे गबाडे यांचे राज्य आहे. शेतकऱ्यांकडून खते व किटकनाशके यांची प्रचंड भाववाढ करून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम सरकार करीत आहे.

 

मी मंत्री असतांना महाज्योती च्या माध्यमातून ओबीसी च्या हजारो युवकांना मदत केली, ओबीसी आरक्षण ६ वरून १९ टक्के केले, गोसीखुर्दसाठी ५००० कोटींचा निधी आणला व ८७००० हेक्टरवर सिंचनाची सोय केली असेही वडेट्टीवार म्हणाले.

 

दिल्लीत इंडीयाचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत तरच हा देश गुलामगिरीतून मुक्त होईल असे वडेट्टीवार यांनी सांगितले. भाजपा सरकारने उद्योगपतींचे साडे सात लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांसाठी त्यांचेकडे पैसे नाही अशीही टिका वडेट्टीवार यांनी केली.