*एटापल्ली तालुक्यातील महामंडळ बसेस पूर्वतह सुरु करा भाजप माजी तालुका अध्यक्ष चे खासदार अशोक नेते कडे निवेदन*
एटापल्ली :- तालुक्यातील एटापल्ली शहरात या आधी बाहेरगावी जाण्यासाठी S.T. महामंडळ तर्फे सुरु असलेले 1) एटापल्ली – गडचिरोली, बस सकाळी 7:30 वाजता जाणारी २) एटापल्ली – चंद्रपुर जाण्यासाठी सकाळी 10:00 वा. व 3) गडचिरोली- एटापल्ली सायंकाळी मुक्कामी येणारी सायंकाळी – 7:30 वाजता या तिनही बस महामंडळ ने बंद केल्याने नागरिकांना 30 किलोमीटर गाठून आलापल्ली जावे लागते. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना बाहेर गेल्या नंतर सांयकाळी परत आपल्या स्वगावी येण्यासाठी कोणतेही वाहतूचे साधन नसल्याने येथील नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. ज्या बसची सुविधा याआधी सुरु होती त्याच प्रमाणे परत बसची सुविधा सुरु करण्यात यावी करून लोकांना त्रास कमी होणार यासाठी खासदार श्री अशोक नेते यांना निवेदन द्यारे भाजप चे श्री बाबुरावजी गंपावर – माजी तालुका अध्यक्ष, निखिल गादेवार – भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली, प्रसाद पुल्लूरवार – माजी तालुका महामंत्री, सुधाकर जी नाईक – माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली आणि भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते



