*”एक हात मदतीचा”….उपक्रमा अंतर्गत लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे मूक बधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना आवश्यक वस्त्रांचे वाटप.*

63

*”एक हात मदतीचा”….उपक्रमा अंतर्गत लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे मूक बधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना आवश्यक वस्त्रांचे वाटप.*

 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे मूक बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपूर द्वारा संचालित,मूक-बधिर निवासी शाळा,मुरखळा ता.जी.गडचिरोली येथे निवासी मुला-मुलींना अंडर गारमेंट्स ,टॉवेल, नॅपकिन या दैनंदिन दिनचर्येत अत्यावश्यक वस्त्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी लॉयन्स क्लब गडचिरोली चे अध्यक्ष लॉ.सतीश पवार,सचिव लॉ.किशोर चिलमवार,कोषाध्यक्ष लॉ.नितीन चंबूलवार, लॉ.शांतीलाल सेता,लॉ.नादिरभाई भामानी,लॉ.परवीन भामानी,लॉ.शेषराव येलेकर,लॉ.संध्या येलेकर,लॉ.गिरीश कुकडपवार, लॉ.ममता कुकडपवार,लॉ.सुनील देशमुख,लॉ.नीलिमा देशमुख,लॉ.सुचिता कामडी,लॉ.संध्या चिलमवार, लॉ.प्रशांत काळे,बेबी लॉ.साईशा चिलमवार,लियो लॉ.रुद्राक्ष काळे,शाळेचे अधीक्षक श्री.हाडगुडे सर इतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाला लॉयन्स क्लब गडचिरोली चे सचिव लॉ.किशोरभाऊ चिलमवार यांचे अर्थसाह्य लाभले,कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना अल्पोपहार व मिठाई देऊन करण्यात आली.

आपल्याला काही तरी मिळाल्याचा आंनद विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर व आपण समाजासाठी काही तरी चांगलं करू शकतो याचा आंनद लॉयन्स सदस्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होता,कार्यक्रमाचे संचलन लॉ.संध्या चिलमवार यांनी केले.