*खासदार अशोक नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट.*

72

*खासदार अशोक नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट.*

 

दि.२४ ऑगस्ट २०२३

 

गडचिरोली:- भाजपा बूथ प्रमुख पुरुषोत्तमजी सूर्यवंशी आंबेशिवणी यांची पत्नी सौ. शितल पुरुषोत्तम सूर्यवंशी हिला आज साडेतीन वाजता च्या दरम्यान शेतामध्ये काम करीत असतांना अचानकपणे विषारी सापाने सर्पदंश केला.तसेच साखरा येथील सर्पमित्र अक्षय हुलके हे विषारी साप पकडून सोडण्यासाठी जात असतांना, त्याला सुद्धा अचानक सर्पदंश केला या दोन्ही घटनेची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष यांना कळताच यांनी लगेच रुग्णालयाची धाव घेण्यासाठी जात असतांना खासदार महोदय हे कॉम्प्लेक्स च्या शासकीय विश्रामगृह येथे असल्याची माहिती मिळाली व खासदार महोदयांना दोन्ही घटनेची माहिती यांना दिली असता या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी लगेच तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट घेतली व रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व आयसीयूमध्ये असलेल्या सर्व रुग्णांच्या तब्येतीची काळजी घेण्यासंबंधी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळंकी साहेब यांना त्यांच्या तब्येतीकडे काळजी घेण्याची सूचना केल्या.

तसेच याप्रसंगी जिल्ह्यातील आरोग्याच्या सोयीसुविधेचा आढावा घेतला.

 

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, अनिल करपे उपस्थित होते.