भाजपाला रोखण्यासाठीच समविचारी प्रादेशिक पक्षाची मोटबांधणी ! शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांची पत्रकार परिषदेतून माहिती

75

भाजपाला रोखण्यासाठीच समविचारी प्रादेशिक पक्षाची मोटबांधणी !

शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांची पत्रकार परिषदेतून माहिती

गडचिरोली: केंद्रातील भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नसून भांडवलदारांचे हित जोपसणारे सरकार आहे. या सरकारच्या सत्ताकाळात ओबीसी, दलित आदिवासींच्या अधिकारांवर गदा आणून जनविरोधी काम केले जात आहे. भारताचे संविधान व लोकहिताचे कायदे बदलविण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या विरोधातील मतविभागणी रोखण्यासाठी राज्यातील तेरा प्रादेशिक पक्षांच्या नावाने आघाडी तयार करण्यात आली असून गडचिरोली जिल्हयात सुध्दा ही आघाडी जोमाने काम करणार आहे, अशी माहिती प्रादेशिक पक्षाचे जिल्हयातील आघाडीचे प्रमुख शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी आज रविवारी विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.

 

या आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्यूलर, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशान पक्ष, भाकपा लिबरेशन पार्टी, रिपाई सेक्युलर पार्टी आणि श्रमिक मुक्त दल या तेरा घटक पक्ष असून महाराष्ट आघाडीत सहभागी आहेत.

गडचिरोली जिल्हा स्तरावर अखिल भारतीय रिपब्लीकन पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी युवा विकास परिषद, खदानविरोधी ग्रामसभा यांनाही आघाडीत सहभागी करून घेण्यात आले असून भाजप सरकार विरोधात जनमत एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती रामदास जराते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला श्यामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्रीताई वेळदा, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलींद बांबोळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे सहसचिव जगदिश मेश्राम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हसंराज उंदिरवाडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, अक्षय कोसनकर, तितिक्षा डोईजड उपस्थित होेते.

शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी असे सांगितले की, महाराष्ट्रात समविचारी प्रादेशिक पक्ष महाविकास आघाडीचे घटक असतील आणि देशात ते इंडिया सोबत असतील. परंतू दोन्ही पातळीवर आमच्या आघाडीचा सन्मान राखला जाईल तरच असेही जराते यांनी स्पष्ट केले.