*राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने एकारा येथे कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न*
*शेकडो रुग्णांनी घेतला शिबीराचा लाभ*
वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, वर्षभरात किमान 300 रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहीले अत्याधुनिक, कॅन्सरचे निदान करणारे फिरते हाॅस्पिटल जनतेच्या सेवेत राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने समर्पित करण्यात आले आहे.
या फिरत्या कॅन्सर तपासणी हाॅस्पिटलच्या माध्यमातून आज दि. 28 आॅगस्ट रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगलव्याप्त भागात वसलेल्या एकारा येथे सदर कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली आहे. या शिबिरात तज्ञ डाॅक्टरांकडून नागरिकांची कॅन्सर तपासणी केली गेली. त्यामध्ये रुग्णाला कॅन्सर आजाराची सुरुवात झाली आहे असे 4 रुग्ण तपासणी दरम्यान आढळून आले. या रुग्णांना पुढील उपचाराच्या संदर्भाने याठिकाणी मार्गदर्शन करून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
सदर शिबीराला प्रामुख्याने माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, कॉंग्रेसचे जेस्ट नेते नानाजी तुपट, रमेश भैसारे सरपंच एकारा,दिपक कुभंरे सरपंच किटाळी, हरीचंद्र गेडाम उपसरपंच एकारा, भुज उपसरपंच सुरेश ठिकरे, इंजि. अमोल सुकारे, ग्रा.पं.सदस्य अशोक बोरकर ग्रा.प.सदस्य, से.सो. अध्यक्ष रामभाऊ देशमुख, अशोक भुते कॉंग्रेसचे जेस्ट नेते, किटाळी ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष शांताराम रामटेके,हर्षद भैसारे, श्रीरंग सिडाम, सुरेश पुस्तोडे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी शिबीर समन्वयक राहुल मैंद, डाॅ. वैष्णवी बाभरे, मेडीकल सोशल वर्कर नंदा कोल्हे, टेक्निशियन तायडे सर, सुजाता डाबरे, कुनाल उरकुडे यांनी सहकार्य केले.



