*भाजप महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन*
*शहरातील ६० ऑटो रिक्षा चालक व डिलिव्हरी बॉय बांधवांना बांधली राखी*
*गडचिरोली–दि.०१ सप्टेंबर २०२३*
*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली च्या वतीने महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ.चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा चौकातील ऑटो रिक्षा स्थानक येथे ६० ऑटोरिक्षा चालक व डिलिव्हरी बॉय बांधवांना रक्षासूत्र बंधन केले तसेच पेढा भरवुन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.*
*यावेळी जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके,शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी जी.प.सभापती रंजिताताई कोडाप,शहर महामंत्री वैष्णवीताई नैताम,माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर,माजी नगरसेविका लताताई लाटकर,माजी नगरसेविका नीताताई उंदिरवाडे,शहर उपाध्यक्ष कोमलताई बारसागडे,ओबीसी महिला आघाडी शहर अध्यक्ष अर्चनाताई निंबोड,माजी शहर अध्यक्ष पल्लविताई बारापात्रे तसेच भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.*



