*झाडापापडा इलाक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात बैठक संपन्न*

69

*झाडापापडा इलाक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात बैठक संपन्न*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*

 

*बैठकीला तहसील ,पंचायत समिती , बांधकाम विभाग,वनहक्क व पेसा समन्वयक यांचे सह ग्रामसभा प्रतिनिधींची उपस्थिती*

 

 

*दिनांक ४ सप्टेंबर गडचिरोली*

 

*झाडापापडा इलाख्यातील ३७ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून त्याच संदर्भात नियोजन करण्यासाठी धानोरा पंचायत समिती, तहसील कार्यालय, वन हक्क, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जिल्हा परिषद बांधकाम विभाग , वनविभाग व पेसा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बैठकीच्या प्रसंगी दिली.*

 

*बैठकीला धानोरा पंचायत समिती, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री /प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम विभाग , वनविभाग व वनहक्क व पेसा समन्वयक यांचे सह झाडापापडा इलाख्यातील ग्रामसभा प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.*

 

*यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी स्थानिकांचे वन हक्क व सामूहिक वन पट्टे मिळण्यासाठी करावयाची प्रक्रिया समजून घेण्याची आवश्यकता असून स्थानिक गावकऱ्यांना यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे निर्देश दिले. या परिसरात आवश्यक असणाऱ्या रस्ते पूल यासह विविध विकास कामांची यादी स्थानिक ग्रामसभा प्रतिनिधी यांचेसह उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी बैठकीच्या प्रसंगी सांगितले.*