Home Breaking News *महाराष्ट्रातील पहिले “कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स” आज पासून सावली तालुक्यातील जनतेच्या...

*महाराष्ट्रातील पहिले “कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स” आज पासून सावली तालुक्यातील जनतेच्या सेवेत*

130

*महाराष्ट्रातील पहिले “कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स” आज पासून सावली तालुक्यातील जनतेच्या सेवेत*

 

*कॅन्सर तपासणी हॉस्पिटल चे थाटात उदघाट्न व पहिल्याच दिवशी शेकडो नागरिकांची तपासणीसाठी उपस्थिती.*

 

*दिनांक: ०६सप्टेंबर २०२३*

 

*सावली(ता.प्र):- आज सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार व नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.ही कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडी आज पासून ६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर एक महिना सावली तालुक्यातील नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.*

 

*वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रूपये खर्च करून ‘कर्करोग निदान’ करणारी रूग्णवाहिका जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून समस्त जनतेला १५ जून २०२३ ला विशेष प्रयत्नातून जनतेस समर्पित केली.राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग चंद्रपूरात राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे*

 

*कॅन्सर तपासणी हॉस्पिटलच्या उदघाट्ना प्रसंगी सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,नं.प.सावलीचे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकर, बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा सभापती मा.अंतबोध बोरकर, नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.अंजली देवगडे,सौ.प्रियंका रामटेके,सौ.ज्योती गेडाम, सौ.सिमा संतोषवार, नगरसेवक मा.प्रफुल वाळके, मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से, मा.गुणवंत सुरमवार, तसेच सौ.कविता मुत्यालवार, सौ.शिला गुरुनुले,मा.सुधीर पंदिलवार, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,बादल गेडाम,आदी उपस्थित होते.*

Don`t copy text!