विदर्भ राज्य आंदोलन समितीची राज्य कार्यकारिनीची बैठक वर्धा येथे संपन्न
वर्धा जि. प्र.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची वर्धा येथे दि.5 संप्टेंबर रोज मंगळवार ला राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यात आली.या बैठकीला विदर्भ आंदोलन समितिचे प्रमुख अध्यक्ष माजी आमदार मा.ऍड.वामनराव चटप, अरुण भाऊ केदार, श्रीमती रंजना ताई मामर्डे अध्यक्षा, महिला आघाड़ी विदर्भ प्रदेश, मुकेश मासुरकर अध्यक्ष, युवा आघाड़ी विदर्भ प्रदेश, तसेच विदर्भाचे प्रमुख नेते मंडळी यांची उपस्थिति होती.
मंचावर विदर्भातील११ ही जील्हयाचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिति होती.प्रामुख्याने गडचिरोली जील्हयाचे जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग अशोक पोरेड्डीवार, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्रजी ठाकुर यांची आवर्जुन
उपस्थिति होती .
वेगळ्यां विदर्भाच्यां आदोलना साठी संपूर्ण विधरभातिल् 11 जिल्हे पिंजुन काढणार आणी आदोलनामध्ये युवकांची भली मोठी फळी उभारणार तर एकतर वेगळ्यां विदर्भ राज्याची विजयी यात्रा निघणार किंवा आमच्या विदर्भावर प्रेम करणा-या विदर्भवाद्यांची प्रेत यात्रा निघणार सरकार समोर दोनच पर्याय …
विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ मिळवू औंदा या कार्यक्रमा अंतर्गत दि.31 डिसेंबर 2023 स्वतंत्र विदर्भाचे मिळवण्याकरिता ” करू किंवा मरू किंवा जेलमध्ये जाऊ ” अशी घोषणा केली असून या आंदोलनात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवून आंदोलन तीव्र करून घटनेतील कलम 3 प्रमाणे सरकारला विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याकरिता भाग पाडून स्वतंत्र विदर्भ राज्याची 118 वर्षाची मागणी कायमस्वरूपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे…!
म्हणून आज दि.05/09/2023 रोजी वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची कोअर कमिटी च्य बैठकीत 28 सप्टेंबर 2023 रोजी विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपुर कराराची होळी जिल्हा-जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेतला असून भारताच्या स्वातंत्र्याचा लढाईचे प्रतीक असलेले आष्टी शहीद जिल्हा वर्धा येथून विदर्भ संकल्प पदयात्रा दि.30/09/2023 पासून काढून ती तळेगाव – आर्वी – कौडण्यपुर अशी जाणार असून दि.02/10/2023 ला दुपारी 12 वाजता विदर्भ संकल्प महिला मेळावा व रुक्मिणीला साकडे आंदोलन दुपारी 01 वाजता सुरू होणार आहे.
विदर्भातील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे…!



