Home Breaking News *दारू तस्करांकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*दारू तस्करांकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

169

*दारू तस्करांकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

 

*एटापल्ली पोलिसांची कारवाही*

 

 

एटापल्ली,

दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी एटापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या तुमरगुंडा रोडवर भांडारकर नाल्या जवळ जंगलामध्ये पोलिसांनी रेड केली असता खाकी खर्ड्या चे रॅकेट संत्रा देशी दारू चे एकूण ७ बाँक्स किंमत अंदाजे ७० हजार रुपये व ईम्पेरियल ब्ल्यू चे ४ बाँक्स किंमत ५७ हजार ६०० रुपये व हावड्स कंपनी चे बिअर ३ बाँक्स किंमत अंदाजे १८ हजार रुपये असा एकूण मुद्देमाल १ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला.

सदर कारवाही मध्ये ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१) गट्टू चंद्रय्या गणड्राराकोटा २) सदाशिव मल्लय्या निकाडे ३) भास्कर भंगारु पुलगम हे तिघेही राहणार पंदेवाही टोला असे तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे करीत आहेत.

Don`t copy text!