Home Breaking News *१० सप्टेंबरला गडचिरोली विधानसभेतील बूथ पालकांचा मेळावा*

*१० सप्टेंबरला गडचिरोली विधानसभेतील बूथ पालकांचा मेळावा*

83

*१० सप्टेंबरला गडचिरोली विधानसभेतील बूथ पालकांचा मेळावा*

 

 

*गडचिरोली येथील पत्रकार भवनात बूथ पालक मेळाव्याचे आयोजन*

 

*या मेळाव्याला सर्व बूथ पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन*

 

*मेळाव्यानंतर सर्वजण करणार गडचिरोली शहरातील सर्व बुथांवर २ तास घर-घर महा जनसंपर्क अभियान*

 

*दिनांक ९ सप्टेंबर २०२३ गडचिरोली*

 

*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोज रविवारला सकाळी ११ वाजता पत्रकार भवन धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला सर्व बूथ पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी या प्रसिद्धीच्या माध्यमातून केले आहे.*

 

*या बूथ पालकांच्या मेळाव्याला खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वय प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, रविंद्रजी ओल्लारवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा केंद्रावरील प्रमुख पदाधिकारी तसेच गडचिरोली चामोर्शी धानोरा या तीनही तालुक्यातील व शहरातील बुथ पालक प्रामुख्याने अपेक्षित आहेत.*

 

*या मेळाव्यानंतर उपस्थित पालकांच्या वतीने गडचिरोली शहरातील सर्व बुथांवर २ तास घर घर संपर्काच्या माध्यमातून महाजनसंपर्क अभियान राबवणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.*

Don`t copy text!