Home Breaking News *जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण...

*जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!!*

85

*जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!!*

 

*माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून (27777/- रुपये) विशेष पारितोषिक.!*

 

*क्रीडा संमेलन ग्रामीण भागात आयोजित करणे गरजेचे- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे*

 

*गडचिरोली दि.6*:-मूलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथे जय माँ काली फुटबॉल क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झाल, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे हे होते,

 

अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात आपलं ध्येय गाठण्यासाठी ज्या सोयी सुविधा पाहिजे त्या उपलब्ध होत नसल्याने गुणवत्ता असूनही आपल्या ग्रामीण भागातील युवक क्रीडा क्षेत्रात कमी पडतो, म्हणून ग्रामीण भागात क्रीडा संमेलनाचे आयोजन करणे गरजेचे आहे त्यामुळे युवकांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांना क्रिडा संमेलनाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता वाढवता येते आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवक आपलं आयुष्य घडवू शकतो असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर येथील भव्य फुटबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या टीमला माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विशेष पारितोषिक म्हणून (27777/- रुपये) देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजेत्या टीमला (21111/-रुपये) गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) यांच्या कडून देण्यात आले.

 

यावेळी आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे हे होते,तर भाजपचे मूलचेरा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, तालुका उपाध्यक्ष विजय बिश्वास,ग्रामपंचायत उपसरपंच तपन मल्लिक,ग्रामपंचायत सदस्य बबलू शील,किशोर मल्लिक,प्रतिष्ठित नागरिक तसेच परिसरातील फुटबॉल खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!