रेकार्ड नोंदीनुसार मुळ जागेवरच नाल्याचे बांधकाम करावे !

101

रेकार्ड नोंदीनुसार मुळ जागेवरच नाल्याचे बांधकाम करावे !

*********************

*मूळ नाला शोधण्यात नगर पालिकेचे अपयश*

नगर परिषदमध्ये देखभाल दुरीस्तीचे कामे करणाऱ्याच्या भरवशावर चालते नगरपरिषद

*********************

रस्त्याच्या आतून गणेश नगर मधील नागरिक करू देणार नाही नाला

*********************

नाल्याला विरोध नाही पण रेकॉर्ड नोंदी नुसार काढा अन्यथा आंदोलन करू

****************-********

गणेश नगर ,रेव्हेन्यू कॉलनी मधील नागरिकांची मागणी

****************

गोकुळनगर येथील तलावातील वाहून जाणारा जुना नालाच गायब झाल्याने पावसाळयात रेव्हेन्यू कॉलनी मध्ये पाण्याचा जलस्तर वाढून नागरिकांच्या वस्तीत पाणी शिरते. ही समस्या लक्षात घेऊन नगपालिकेने नाल्याचे बांधकाम मंजूर केले आहे. मात्र नाल्याचे बांधकाम करतांना गणेश नगर, रेव्हेन्यू कॉलनी मधील नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण न करता नगरपालिकेच्या जुन्या रेकार्ड मधील नकाशा नोंदीनुसार नाल्याचे बांधकाम करावे अशी मागणी या वार्डातील नागरिकांनी केली आहे.

 

चंद्रपूर रोडलगत पुर्वी शेतजमिनी होत्या. गोकुळनगर येथील मुख्य तलावाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुर्वी जुना नाला होता. या नाल्याचे पाणी विसापूर रोडकडे निघून जात होते. परंतू आता या भागात लोकवस्ती निर्माण होऊन पाणी वाहून जाणारा नालाच गायब झाल्याने पावसाचे पाणी रेव्हेन्यू कॉलनी मध्ये साचते. सर्व्ह नंबर. 844 आणि सर्व्हे नंबर 855 या खडसे लेआऊट एन ए टीपी (NATP) 2005 शांसन लेआऊट आहे. या लेआऊट मध्ये कोणत्याही प्रकारचा नाला दर्शविला नाही आहे. रेव्हेन्यू कॉलनी मध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नगर पालिकेने रेव्हेन्यू कॉलनी मधील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचे बांधकाम मंजूर केले आहे. नाला बांधकाम करतांना कोणावरही अन्याय न करता महसूल व नगर परिषदेच्या रेकार्ड मध्ये नोंदीनुसारच नाला बांधकाम करावे. अन्यथा नाला बांधकामाला विरोध केल जाईल, असा इशारा गणेश नगर, रेव्हेन्यू कॉलनी मधील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

रेव्हेन्यू कॉलनी, गणेश नगर परिसरात आता मोठया प्रमाणात वस्ती निर्माण झाली आहे. नागरिकांनी नगर परिषदेची रीतसर परवानगी घेऊन आपले घरे बांधली आहेत. रस्त्याच्या आतून आणि घरसमोरून नाला काढण्यास नागरिकांचा विरोध आहे. रेकॉर्ड नुसार नाला काढण्यास नागरिकांचा कुठलाही विरोध नाही. नगर पालिकेत एक प्रायव्हेट देखभाल दुरुस्ती चे काम करणारा दलाल आहे त्याच्या इशाऱ्यावर नगरपालिका अधिकारी त्याच्या सोबत या परिसरात येऊन कॉलनीत फिरतात आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असे आरोप गणेश नगर मधील नागरिकांनी केलं आहे. त्यामुळे नाल्याची जागाच गायब झाली आहे. 2005 पासून नगर पालिका अधिकारी काय करीत होते? तेव्हा त्यांना नाला दिसला नाही का? आता लोकवस्ती झाल्यावरच नगर पालिकेला जाग आली का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळेच आता ही समस्या निर्माण झाली आहे.

नगर पालिकेत पाणी साचतो तर नगर परिषद फोडणार का असा सवाल सुद्धा उपस्थितानी केला आहे.

प्लॉट विक्रीचे व्यवसाय करणारा दलाल नगर पालिका प्रशासनाला चुकीची माहिती देऊन वार्डात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहे त्याच्या विरुद्ध रीतसर पोलिसात तक्रार करणार असे सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

 

नव्याने नाला बांधकाम करतांना नाल्याची मुळ जागा कोणती हे प्रथम नगरपालिकेला शोधावे लागेल. कुणाच्याही घरासमोरून नाला तयार केल्यास नागरिकांचा प्रखर विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पत्रकार परिषद मध्ये नागरिकांनी सर्व पुरावे घेऊन पत्रकार परिषद घेतले हे विशेष होते. कॉलनी मधील कोणत्याही नागरिकांवर भेदभाव न करता नाल्याची मुळ जागा शोधूनच नाला बांधकाम करावे अशी मागणी वार्डातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

********************

*नगर परिषद जबरदस्ती नाला काढण्याचा प्रयत्न करून आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करीत असेल तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा तेथील महिलांनी दिला आहे.*

यांनी मागणी केली आहे.कुणाल पेंदोरकर, प्रवीण चंन्नावार, श्रीनिवास दुल्लमवार, वासुदेव भोयर, आशीष खडसे, वरखडे, अरविंद सालोटकर, अमर रामटेके, मधुकर कुमरे, आरिफ कनोजे, वनिता सेलोटे, वर्षा भोयर, मनीषा चनावार, वैशाली धाइत ,कविता चकिनारपवार, मनीषा ढवळे, हे उपास्थित होते.