*बूथ पालकांनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता*
*आमदार डॉ देवरावजी होळी*
*गडचिरोली येथे विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा*
*दिनांक १० सप्टेंबर २०२३ गडचिरोली*
*भारतीय जनता पार्टीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १०० वॉरियर्स (बूथ पालक) नेमलेले असून हे बूथ पालक भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीत विजयाचे शिल्पकार ठरणार असल्याने आपल्यावरील कामाची जबाबदारी वाढली आहे त्यामूळे जबाबदारीचे काटकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथील आयोजित विधानसभा क्षेत्राच्या बूथ पालकांच्या मेळाव्याला संबोधित करताना केले.*
*यावेळी मंचावर, खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री, रवींद्रजी ओल्लारवार ,महामंत्री प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे महिला आघाडीच्या नेत्या रेखाताई डोळस, प्रामुख्याने उपस्थित होते.*
*या बूथ पालक मेळाव्याला भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुका तसेच गडचिरोली शहरातील १०० बूथ पालक प्रामुख्याने उपस्थित होते. बूथ पालक मेळाव्यानंतर गडचिरोली शहरात महा जनसंपर्क अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले.*




