*देसाईगंज तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार*

65

*देसाईगंज तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार*

 

 

देसाईगंज :- तालुक्यातील फरी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव महानंदा दिनेश मोहुर्ले असून वय अंदाजे 50 वर्षे आहे. हल्ली शेतातील निंदणी सुरू आहे. तसेच पाऊस पडल्याने पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतावर जात असतात. अशातच काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांची दहशत कमी झाली असल्याने अनेक नागरिक सुखावले होते. मात्र आज 10 वाजताच्या सुमारास फरी येथील महिला शेतामध्ये काम करत असतांना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.