सार्वजनिक हनुमान मंदिर विवेकानंद नगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
सर्व बालगोपालांना राकेश रत्नावार यांचे कडून बक्षिस वितरण
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली येथील विवेकानंद नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. तान्हा पोळ्या निमित्ताने सर्व बालगोपाल एकत्रित येऊन नंदी बैल सजवून व वेशभूषा करून मोठया उत्साहात संपन्न झाला.
तान्हा पोळ्यात सहभागी बालगोपालांना सार्वजनिक हनुमान मंदिर अध्यक्ष राकेश रत्नावार यांचे कडून बालगोपालांना बक्षीस देण्यात आले.यावेळी शरद भानोसे, डबाजी डोइजड,आनंदराव डरडमारे, गुरुदास पगाडे,राजु भारती,गणपत येलमूलवार,प्रकाश राजगुंडावार,रोहित चंदावार, सचिन टेकाम, मिलिंद बारसागडे,विनायक चिचघरे, गणेश राऊत,सूरज टेकाम,मुना वस्कर, उमाकांत कुकुडकर,शाबाज शेख,विकास रेहेनकार,प्रभू रोहनकर, अनिता डोईजड,वैशाली सातपुते, कैलास बारसागडे,निखिल मुरूमवार, राजू कटइवर,अमोल पगाडे,जया देशमुख, महेश रत्नावार, मुकेश गेडाम,गोलू सुर्यवनशी,व वार्डातील नागरिक उपस्थित होते.




