*आयुष्यमान भव योजनेचा शुभारंभ*
*नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गोकुलनगर गडचिरोली येथे कार्यक्रमाचे आयोजन*
*गडचिरोली- दि.13 सप्टेंबर*
*भारतात सर्वत्र आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या योजनेची सुरुवात होणार असून या अंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी,स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिर,अवयवदान जागृती मोहीम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.*
*स्थानिक गोकुलनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, नप मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दूरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गेडाम,सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी हेपट,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, महिला आरोग्य समिती सदस्य,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी व आशा उपस्थित होते.*
*१७ सप्टेंबर ते ०२ऑक्टोंबर दरम्यान आयुष्यमान भव सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.आयुष्यमान आपल्या दारी अंतर्गत गृहभेटी,आयुष्यमान कार्ड नोंदणी,आभा कार्ड नोंदणी व वितरण करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. याअंतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची आरोग्य तपासणी,क्षयरोग,कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार,माता व बाल आरोग्य,पोषण आरोग्य सुविधा सिकलसेल तपासणी,नेत्ररोग चिकित्सा,कान,नाक,घसा तपासणी केली जाणार आहे.*




