*मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये*
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा गडचिरोली यांचे मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फततिने मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री यांना निवेदन*
*गडचिरोली- दि.20 सप्टेंबर*
*मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये.ओबीसी समाजाचे आरक्षणाला धक्का लागू नये, मराठा आरक्षणाबाबत सर्व ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे.*
*निजामशाहीच्या दस्तनुसार मराठासमाजास कुणबी मध्ये परिवर्तित करून ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारने जी समिती बनवली आहे.त्यास आमचा विरोध आहे.*
*मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने 11 आयएएस- आयपीएस सदस्यांची समिती नेमली आहे. त्यास आमचा तीव्र विरोध असून त्याचा आम्ही निषेधही करत आहोत,अशा समितीने नेमल्यापेक्षा राज्यातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्याची आमचीच नव्हे तर अनेकांची मागणी आहे. त्यानुसार राज्य/केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी व आरक्षणाची जी 50% ची मर्यादा आहे ती वाढवून प्रत्यक्ष त्या-त्या जातींच्या संख्येनुसार आरक्षण वाढविण्यासाठी लोकसभेमध्ये अतिरिक्त आरक्षणाचे बिल मंजूर करून घ्यावे जेणेकरून अनेक वर्षापासूनचा जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारा व सततचे डोकेदुखी ठरणाऱ्या आंदोलनाचा यक्ष प्रश्नच निकाली काढता येईल.*
*आजमीतीस 56% ओबीसी असून सुद्धा निव्वळ 16% वर आमची बोळवण केलेली असल्यामुळे आम्ही आरक्षण वाढवून मिळावे यासाठी सततची आंदोलने करत:/ असताना राज्य व केंद्र सरकार आमच्या जातनिहाय जनगणना व इतर मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. असा आमचा ठाम समज आहे. मराठा आरक्षणाबाबत ओबीसींची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे उलटपक्षी आमच्यासह सर्व ओबीसी समाजाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, मराठा समाजास फक्त 16 टक्के काय त्यापेक्षा जास्त आरक्षण दिले तरी चालेल पण त्यांचे आरक्षणासाठी आमच्या आरक्षणास धक्का न लावता लोकसभेमधून आजमितीस असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त संख्येचे (०/०) आरक्षण बिल मंजूर करून घ्यावे,त्यास आम्हा सर्व ओबीसींचा पाठिंबाच असेल.*
*राज्य सरकारने ओबीसी विरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनासह समाजातील प्रत्येक घटक मरणांकित उपोषण करेल व त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आला.*
*आपण अनेक वृत्तवाहिनींना मुलाखत देताना घोषणा केली की “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही” आपण केलेली सदर घोषणा लेखी स्वरूपात द्यावी जेणेकरून आमचा सरकार बाबतचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल.*
*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष(उत्तर) प्रमोदजी पिपरे,जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकरजी वासेकर,संताजी सोशल मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष प्राध्या.देवानंद कामडी,विदर्भ तेली समाज महासंघ चे अध्यक्ष सुरेशजी भांडेकर,माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रांतिक तैलिक महासभा (उत्तर)सौ योगिताताई पिपरे,जिल्हा संघटक रामेशजी भुरसे यांच्या नेतृत्वात,अनिल कोठारे,मुक्तेश्वर काटवे,चंद्रकांत किरमे,अशोक चलाख,अनुप कोहळे,गोपीनाथ चांदेकर,सुधाकर दुधबावरे,लालाजी सातपुते,मधुकर भांडेकर,पुष्पाताई करकाडे,सुधाकर लाकडे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा गडचिरोलीचे पदाधिकारी व ओबीसी बांधव निवेदन देतेवेळी उपस्थित होते.*



