*पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी यांचा १०५ वा मन की बात कार्यक्रम खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी गडचिरोली येथील शाहूनगर प्रभाग क्रमांक-५, बुथ नंबर- ९८ येथे खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी थेट प्रेक्षपण पाहतांना*…
दि.२४ सप्टेंबर २०२३
गडचिरोली:-आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा १०५ वा. मन की बात चे प्रसारण झाले. माननीय पंतप्रधान आपल्या मन की बात मध्ये देशात सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी गोष्टी ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी पटलावर आणतात. आज सुद्धा मोलाचे मार्गदर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी केले.
देशाचे विश्वगौरव, सक्षम नेतृत्व,पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा *मन की बात* १०५ व्या भागाचे प्रक्षेपण गडचिरोली येथील शाहूनगर प्रभाग क्रमांक- ५,बुथ नंबर- ९८ येथे खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या समेत पाहण्यात आले.
मन की बात च्या निमित्ताने चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ वर सामूहिक श्रवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान सहभागी झाले.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,जेष्ठ नेते रमेश भुरसे,युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे,आदिवासी मोर्चाचे महामंत्री रेवनाथ कुसराम,तसेच प्रेक्षपण बघण्यासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



