*खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आरोग्य शिबीरांचे उद्घाटन व मन कि बात हा कार्यक्रम नवेगांव(मुरखळा) येथे संपन्न*.
दि.२४ सप्टेंबर २०२३
गडचिरोली:-देशाचे विश्वगौरव, सक्षम नेतृत्व,पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा *मन की बात* १०५ व्या भागाचे प्रक्षेपण गडचिरोली जिल्ह्यातील मन की बात कार्यक्रम नवेगांव(मुरखळा) येथील ग्रामपंचायत प्रभागातील बुथ क्रमांक -१३० व १३१ या बुथावर थेट प्रसारण करुन आयोजित करुन पाहण्यात आले.
माननीय पंतप्रधान आपल्या मन की बात मध्ये देशात सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी गोष्टी ज्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो अशा सर्व गोष्टी पटलावर आणतात. आज सुद्धा मोलाचे मार्गदर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी केले.
मन की बात या कार्यक्रमाचे औचित्य साधुन आरोग्य शिबिर तपासणी चा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या टिमच्या वतीने आयोजित करण्यात आले.
या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील नवेगांव(मुरखळा) येथे तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, मुखाचा, कर्करोगाची पूर्व तपासणी, बीपी, शुगर, अशा विविध आरोग्याची तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करून स्वतः शुगर बीपी तपासून शुभारंभ केला.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे,माजी सभापती मारोतराव ईचोडकर,उपसरपंच राजु खंगार,युवा मोर्चाचे महामंत्री अनिल तिडके,भाजपा युवा कीर्ती कुमार मासुरकर,महीला मोर्चा जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, हर्षित सहारे,निखिल सुंदरकर, निखिल चरडे तसेच सिस्टर आरोग्य शिबिरातील कर्मचारीवर्ग, गावातील नागरिक उपस्थित होते.



