*कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला सावली तालुक्यातील जिबगाव केंद्रावर प्रचंड प्रतिसाद*

200

*कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला सावली तालुक्यातील जिबगाव केंद्रावर प्रचंड प्रतिसाद*

 

*दिनांक: २५ सप्टेंबर २०२३*

 

*सावली(ता.प्र):- आज सावली तालुकातील मौजा.जिबगाव येथे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व विजय किरण फाउंडेशन तर्फे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ही कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडी २५ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर हा दुसरा टप्पा सावली तालुक्यातील नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे.*

 

*स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.आज जिबगाव येथे तब्बल २०९ नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून डॉक्टरांनी पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे.यावेळी जिबगाव, भट्टीजांब, पेठगाव,उसेगाव,सिंदोळा व घोडेवाही येथील नागरिकांनी व गुरुदेव हायस्कूल जिबगांव येथील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला*

 

*कॅन्सर तपासणी शिबिराला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,सावली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व जिबगावचे प्रथम नागरिक मा.पुरषोत्तम चुदरी,ग्राम.पं.सदस्या सौ.मोनीताई उंदीरवाडे,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल, घोडेवाहीचे उपसरपंच मा.चेतन रामटेके, मा.हरिदास मेश्राम,व्याहाड खुर्दचे माजी सरपंच व ग्रा.पं.सदस्य मा.केशव भरडकर, काँग्रेस कार्यकर्ते मा.अरुण पाटील वरगणटीवार,मा.अंकुश पाटील वरगणटीवार,सेवा सहकारी सदस्य मा.मुखरू पाटील गोहने,मा.नथ्थुजि राऊत,काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम, गुरुदेव हायस्कुलचे मुख्याधापक मा.निकुरे सर,मा.डोंगरे सर,मा.खरकुटे सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटलचे डॉक्टर आणी कर्मचारी, गावकरी, शालेय विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने ह्या शिबिरात उपस्थित होते.*