चामोर्शी येथील नवीन तहसिल कार्यालयासमोर दुचाकीला लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने दुचाकीवरील तिघे जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना 25 सप्टेंबर सोमवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.
भावना नरेंद्र जंधलवार वय 38 वर्ष रा. मार्कडा देव, प्रियंका गणेश जंधलवार वय 24वर्ष. मार्कडा देव, रूद्र गणेश जंधलवार वय पाच वर्ष मार्कडा देव असे मृतकाचे नाव आहे. तर नरेश जंधलवार वय 45 वर्ष असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मार्कडा देव येथील रहिवासी नरेश जंधलवार हे आपली पत्नी, पुतण्याची पत्नी व त्याच्या मुलासमवेत दुचाकीने गडचिरोली मार्गांवरील तहसिल कार्यालयात कामानिमित्त गेले. काम आटोपून ते परत येताना तहसिल कार्यालया समोर चामोर्शी वरून गडचीरोली कडे लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात नरेश जंधलवार यांची पत्नी, पुतन्याची पत्नी व मुलगा मुलगा हे ठार झाले तर नरेश जंधलवार हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच ट्रकचालक पसार झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या आतमध्ये फसली होती. घटनेची माहिती होताच चामोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी ला उपचारासाठी चा मोर्शी रूग्णालयात दाखल केले व मृतांना
शवविच्छदनासाठी रूग्णालयात दाखल केले असून. घटनेचा पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहे. एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाल्याने जंधलवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मार्कडा देव येथे शोककळा पसरली आहे