*कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला मौजा.कवठी येथे लोकांचा भरपूर प्रतिसाद*
*दिनांक: २६ सप्टेंबर २०२३*
*सावली(ता.प्र):- आज सावली तालुकातील मौजा.कवठी येथे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व विजय किरण फाउंडेशन तर्फे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल.*
*उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.आज कवठी येथे तब्बल १८५ नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून डॉक्टरांनी काजी पॉसिटीव्ह असलेल्या रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे.यावेळी कवठी, पारडी रुद्रापूर येथील नागरिकांनी व शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय कवठी येथील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला*
*कॅन्सर तपासणी शिबिराला गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे,उपसरपंच मा.राकेश घोटेकर,काँग्रेस कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष पारडी मा. रवीभाऊ गेडेकार, ग्रामपंचायत सदस्य मा.विलास बट्टे,सौ.संगीता पाल,काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.ईश्वर बट्टे,मा.पुरषोत्तम पेंदाम, मा.किशोर बोरकुटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटलचे डॉक्टर आणी कर्मचारी, गावकरी,शालेय विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने ह्या शिबिरात उपस्थित होते.*