भारतीय मानवाधिकार असोसिएशन जिल्हाध्यक्ष पदी मनिष रक्षमवार.

171

भारतीय मानवाधिकार असोसिएशन जिल्हाध्यक्ष पदी मनिष रक्षमवार.

 

मूल/चंदपूर. …..देशातील मानवाधिकाराचे हनन थाबवून शेवटच्या स्तरातील नागरिकांस न्याय मिळवून देण्यासाठी

 

पुढाकार घेणाऱ्या भारतीय मानवाधिकार असोसिएशन, नवी दिल्ली च्या चंदपूर जिल्हाध्यक्ष पदी

युवा पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी मनिष रक्षमवार यांची

नियुक्ती करण्यात आली आहे.

 

असोशिएशन चे विदर्भ प्रदेश महासचिव शैलेंद्र पाटील व विदर्भ अध्यक्ष विलास कांबळे यांनी नुकतीच

चंदपूर येथे मनिष रक्षमवार यांचे नावाची घोषणा केली. १ आक्टोंबर ला

उमरेड येथे आयोजीत विदर्भ स्तरीय

अधिवेशनात आपल्या पदाची सुत्र हाती घेणार असून जिल्हा

कार्यकारिणीची घोषणा रक्षमवार करणार आहेत.

 

मनिष रक्षमवार हे खबर महाराष्ट्राची

या न्युज वेब चे संपादक , राष्ट्रीय मानव व गोसेवा समितीचे संचालक सुद्धा

आहेत.

 

मनिष रक्षमवार यांचे निवडीबद्दल

राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी,विवीध संघटना पदाधिकारी,पत्रकार, मान्यवरानी अभिनंदन केले आहे.