*खासदार श्री.अशोकजी नेते यांची चामोर्शी तालुक्यातील रेखेगांव येथे सांत्वन भेट

134

*खासदार श्री.अशोकजी नेते यांची चामोर्शी तालुक्यातील रेखेगांव येथे सांत्वन भेट*.

 

दि. ३० सप्टेंबर २०२३

 

चामोर्शी: तालुक्यातील रेखेगांव येथील स्व.दिलीप रामजी नरोटे वय ४२ वर्ष यांचे आज दू:खद निधन झाले. स्पंदन हॉस्पिटल गडचिरोली चे संस्थापक डॉक्टर मिलिंद नरोटे सर यांचे ते मोठे बंधू होते.या संबंधितची माहिती मिळताच खासदार अशोक जी नेते यांनी सांत्वन भेट देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून नरोटे यांच्या रेखेगांव येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या आई व डॉ.मिलींद नरोटे यांच्या भेटी दरम्यान सांत्वन केल.

 

याप्रसंगी एककर्ता उमंद युवा धडाडीचा चांगलं व्यक्तिमत्व कर्तृत्ववान तरुण स्व.दिलीप रामजी नरोटे आज अनंतात विलीन झाले अतिशय मनाला दुःख देणारी घटना घडली. मी त्यांच्या दुःखात सामील होऊन देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय अशी प्रतिक्रिया खासदार अशोकजी नेते यांनी दिली.

 

यावेळी स़ोबत जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे,प्रकोष्ठ सहकार क्षेत्राचे अध्यक्ष आशिष पिपरे, चामोर्शी तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,शहराध्यक्ष सोपान नैताम,रेवनाथ कुसराम, नरेश अलसावार,जेष्ठ नेते माणिकचंद कोहळे,जेष्ठ नेते जाणूजी बोदलकर, सतिश भांडेकर, वासुदेव चिचघरे,राकेश राचमलवार,रमेश अधिकारी, निखिल चरडे,उपस्थित होते.