गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन
. मौजा कोठी येथील आठवडी बाजारादरम्यान तज्ञ वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची तपासणी
. या अभिनव उपक्रमादरम्यान पोस्टे कोठी व उपपोस्टे व्यंकटापूर हद्दीतील एकूण 207 नागरिकांची तपासणी
. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली, सीआरपीएफ व शालीनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम
. मौजा कोठी येथील आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृती
गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कोठी येथील आठवडी बाजार परिसरात तसेच गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपपोस्टे व्यंकटापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दोन्ही ठिकाणावरील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मौजा कोठी येथील आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली डॉ. छाया ऊईके (स्त्रिरोग तज्ञ), महिला व बाल रुग्णालय गडचिरोली डॉ. मनिषा गेडाम (बालरोगतज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. मनिष मेश्राम, शैलेश मानमोडे (फार्मसिस्ट), तसेच 113 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक नारायण, यांचे नेतृत्वात तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आयोजित आरोग्य मेळाव्यात डॉ. रविंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन डॉ. सारंग डोंगरे, डॉ. प्रांजल नागोसे यांनी नागरिकांच्या नेत्र समस्यांविषयी तपासणी केली.
मौजा कोठी येथील मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 107 नागरिकांची व उपपोस्टे व्यंकटापूर हद्दीतील सुमारे 100 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 36 नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच बालरोग तज्ञांकडून शालेय विद्याथ्र्यांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 196 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 42,500 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण 05 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,361 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल मौजा कोठी येथील आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, कमांडंट सीआरपीएफ 113 बटा. श्री. जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. कार्तिक दळवी तसेच उपपोस्टे व्यंकटापूरचे प्रभारी अधिकारी पोउपनि. राजु गड्डापोळ व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.






