Home Breaking News *महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा...

*महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

12

*महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.२३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2026 अंतर्गत जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे मतदान केंद्र क्रमांक 1/1 निश्चित करण्यात आले असून, ते जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ, तळमजला, कॉम्पलेक्स, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे असणार आहे.

 

या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या पात्र मतदारांनी मतदानासाठी येताना ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील.

 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन केले आहे की, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

Don`t copy text!