एटापल्ली पोलिसांनी अवैध दारूसह सत्तर हजारांचा मुद्देमाल केला जप्त
एटापल्ली: दिनांक २९ स्पटेंबर रोजी सायंकाळी ७ :०० वाजताचे दरम्यान पोलिस निरीक्षक निळकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डुम्मे ते एटापल्ली रोडवरुन मोटार सायकलने अवैध दारू तस्करी करणार असल्याची माहिती एटापल्ली पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने नमूद मोटार सायकल एटापल्ली कडे येताना दिसली मोटार सायकल थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडे मोटारसायकलवर असलेल्या एका चुंगडी मध्ये देशी दारुच्या नीपा मिळून आल्या नमूद व्यक्तीस त्याचे नाव विचारले असता प्रीतीश गुरुप्रसाद बाला रा. चंद्रपूर असे सांगितले त्याचे जवळ देशी दारू व एक मोटारसायकल सायकलसह एकुण ७०,००० ( सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला नमूद आरोपी विरोधात पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अपराध क्रमांक ६७ / २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे




