दोन नवजात बालकानंतर तिसरा बालक आईविना झाला पोरका•••! गडचिरोली येथील महिला रुग्णालयात प्रसूती झालेल्या तिसऱ्या मातेचा झाला मृत्यू

133

दोन नवजात बालकानंतर तिसरा बालक आईविना झाला पोरका•••!

गडचिरोली येथील महिला रुग्णालयात प्रसूती झालेल्या तिसऱ्या मातेचा झाला मृत्यू

 

गडचिरोली येथील महीला व बाल रुग्णालयात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यु झाल्यानंतर तिन ऑक्टोंबर मंगळवारी नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात भरती असलेल्या मातेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता त्या सिझेरियन प्रसुतीनंतर मृत मातांची संख्या तीन झाली आहे.

वैशाली सत्यवान मेश्राम वय 25 वर्ष रा. आष्टी. ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली मेश्राम हीला मुलगी झाली होती.

 

25 सप्टेंबर रोजी गडचिरोली येथिल महीला व बाल रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर उज्वला बुरे, रजनी शेडमाके, वैशाली श्रम आणि अन्य महीला यांची प्रकृती खालावली. यात रजनी शेडमाके हीचा गडचिरोली येथील रुग्णालयातच तर उज्वला बुरे हिला नागपूर येथे नेताना वाटेतच मृत्यु झाला. तर वैशाली मेश्राम हिच्यावर नागपूर येथील मेडिकल रूग्णालयात उपचार सुरू असताना 3 ऑक्टोंबर रोजी मृत्यु झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे च या मातांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून यामध्ये तीन नवजात बालके आपल्या आईविना पोरकी झाली आहे. या घटनेनंतर गडचिरोली येथिल महीला रुग्णालयाच्या आरोग्यव्यवस्थेवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन मृत महिलांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात येत आहे.