*शिवशौर्य जागरण यात्रेचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले स्वागत.*
*श्री छत्रपती शिवाजी महाराज जागरण यात्रेचे गडचिरोली शहरामध्ये आगम.*
दिनांक :- 4 ऑक्टोंबर 2023
गडचिरोली :- शिवराज्याभिषेक 350 वर्ष पूर्ती निमित्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आगमन गडचिरोली शहरांमध्ये झाले.त्यानिमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे स्वागत केले.
त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी यात्रेला थोडक्यात संबोधित करताना बोललेत की,
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हे देशभक्त व हिंदुत्ववादी संघटना असून या संघटनेने आयोजित केलेल्या शिव शौर्य यात्रेच्या माध्यमातून श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला घराघरा पोहोचविण्याचा व समोर नेण्याचा काम करीत आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल समोर सुद्धा गौरक्षा,धर्म रक्षा व देश सेवेसाठी तत्परपणे उभे राहील असा विश्वास माननीय जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांनी व्यक्त केले.
त्याप्रसंगी गौ रक्षक प्रफुल बिजवे बजरंग दल जिल्हा संयोजक सचिन ठाकूर,जिल्हा मठमंदिर प्रमुख सुरज काटवे,प्रखंड मंत्री विशाल बिजवे, प्रखंड संयोजक बालाजी भांडेकर व विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




