*अहेरी चेरपल्ली रस्त्याचा मायबाप कोणी आहे का..?*

64

*अहेरी चेरपल्ली रस्त्याचा मायबाप कोणी आहे का..?*

 

*अहेरी:-* उपविभागातील अहेरी शहर हा पाचही तालुक्यांना जोळणारा तालुका आहे त्यामुळे या अहेरी शहरात नेहमीच नागरिकांची रहदारी असते. त्यातच विद्यार्थी, गरोदर महिला, शेतकरी वर्गातील सामान्य नागरिक, छोटेखानी व्यावसायिकांची नेहमीच येजा असते.

नागरिकांना या अहेरी शहरात येतांना येथील रस्त्यांवरून वर्दळ करतांना जीव घेऊन जायचं तरी कसं..? असा सवाल त्याच्या मनात आधी येते, मग तो अनेकदा विचार करतो कधी कुठे माझं अपघात होऊन माझं जीव या प्रवासात जाईल का..?

अहेरी तालुक्यातील नगरपंचायत अहेरी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 17 गडबामनी, व 16 चेरपल्ली या शहरातील गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची मागील 2 वर्षांपासून अती दुरवस्था झाली आहे त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात झालेले आहेत. तसेच अनेक वर्षांपासून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही हे विशेष.

 

*कोड:-*

आपला गाव ग्रामिण मध्ये होता तर ग्रामिण मध्येच राहायचं होत पण काही राजकिय हलकट लोकप्रतिनिधीनी आपल्या गावाला शहरी भागात समाविष्ट करुन आपल्याला व आपल्या गावातील नागरिकांना रस्तेच नवे तर अनेक समस्या पासून वंचित ठेवल आहे याला कारण आधी आपण आहोत आपल्या गावातील नागरिक आहेत म्हणून येत्या निवडणूकीला माझं जाहिर निषेध आणि बहिष्कार आहे

– विनोद रामटेके

चेरपल्ली रहिवासी

 

*कोड:-*

या रस्त्या संदर्भात वारंवार निवेदन देऊन शासन व प्रशासनाकडे मागणी करूनही याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघातास आमंत्रण मिळत आहे म्हणून या अहेरी चेरपल्ली रस्त्याचा कोणी बायबाप आहे का..?

– आशिष सुनतकर

ग्रामीण चेरपल्ली रहिवासी व सामजिक कार्यकर्ता