अवैध रेती वाहतूक करणारा पकडले ट्रॅक्टर ; चालक गेला पळून
धानोरा नायब तहसीलदारांची धडक कारवाई
धानोरा : तालुक्यातील चिचोली घाट येथून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला तालुक्यातील सालेभट्टी येथे सदर ट्रॅक्टर अडवून पाहणी केली असता सदर ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती भरून असल्याचे निदर्शनास आले असता धानोराचे नायब तहसीलदार डी.के. वाळके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिनांक ०७ ऑगस्टच्या रात्री दिड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर चालक पळून गेला यावेळी सदर ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ – २२६६ असून सुधाकर भूपटवार यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले अवैध रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त करून पंचनामा करण्यात आला हि तालुक्यातील सालेभट्टी येथे नायब तहसीलदार डी के वाळके, मंडळ अधिकारी धाईत, नितीन नंदावार, साईनाथ कुमरे, कोतवाल मुकेश यांनी केली या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत




