सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या उपोषणाला भाकपचा जाहीर पाठिंबा

147

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या उपोषणाला भाकपचा जाहीर पाठिंबा

 

 

 

अहेरी;-अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकाम व दुरुस्ती व इतर सर्व मागणीसाठी आयोजित बेमुदत आंदोलनाला भाकपा अहेरी विधानसभा व ऑल इंडिया युग फेडरेशन गडचिरोली जिल्हा कडून जाहीर पाठिबा देण्यात आला या वेळी भारतीय कम्युनिष्ठ पार्टीच्या वतीने अशे म्हटले आहे

 

आम्ही माकपा अहेरी विधानसभा व ऑन इंडिया युग फेडरेशन गडचिरोली जिल्हा, अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकाम व दुरुस्ती व इतर सर्व मागणीसाठी आयोजित बेमुददात आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो.

 

अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या रस्त्यामुळे विद्याथ्यांना शाळा-कॉलेजात जाण्यास रुग्णांना रुग्णालयात अण्यास आणि शेतकऱ्यांना शेतात आण्यास अडचणी येत आहेत.

 

याशिवाय या क्षेतील इतर अनेक समस्या आहेत. ज्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी इत्यादीचा समावेश आहे.

 

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण है आंदोलन आयोजित केले आहे. याबबदल आम्ही तुमची प्रशंसा करतो आंदोलन यशस्वी होऊन या क्षेत्रातील नागरीकांना न्याय मिळेल या दृढ विश्वासाने आणि आमचे सदैव सहकार्य असेल ही ग्वाही देतो व आंदोलनाला पाठिंबा जाहिर करतो या वेळी भाकप चे सचिन भाऊ मोतकूरवार. भाकप. अध्यक्ष अहेरी विधानसभा क्षेत्र

2 शरीफ शेख तंजिमा इंसाफ अध्यक्ष अहेरी विधानसभा क्षेत्र

3 सुरज जक्कलवार. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन जिल्हा अध्यक्ष

. संतोष मल्याळवार.अक्षय करपे. राजू मामेडवार.उपस्तीत होते

 

सोबतच आलापल्ली येथील महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला येथील महिलांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि ताटिकोंडावार यांचे आभार मानले आपले उपोषण हे समाज हिताचे असून प्रशंसनीय आहे आमचे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे अशे मनोगत व्यक्त केले

 

या वेळी आलापल्ली येथील

 

 

प्रमिला कुरसंगे. निर्मला मडावी.नेहा मांडवगडे. नयना तोडसाम. कुसुम मेश्राम

वंदना ठाकरे . लक्ष्मीबाई गोंडे. सरोजा गंजीवर. अनिता भूपल्लीवार. नागुबाई बोडेवार. लता तोगरवार. अश्विनी अनगंदलवार लक्ष्मी कपलवर. आरती सलाम उपस्तीत होते