तासिका मानधन शिक्षकांवर मानधनाअभावी उपासमारीची पाळी

193

तासिका मानधन शिक्षकांवर मानधनाअभावी उपासमारीची पाळी

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

जि. प. गडचिरोली अंतर्गत एकुण आठ माध्य. तथा उच्च माध्य. शाळा सुरु आहेत. परंतु शिक्षक भरती प्रक्रिया न झाल्यामुळे अगदी तात्पुरत्या स्वरुपात तासिका मानधन तत्वावर आम्हा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी तासिके – प्रमाणे आम्हा शिक्षकांचे मानधन काढण्यात येत होते, परंतु सत्र २०२२-२३पासून प्रती तास याप्रमाणे मानधन काढण्यात आले. त्यामुळे आम्हा शिक्षकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. एकिकडे शासन सेवानिवृत्त शिक्षकांना एकत्रित २०,०००/- रु. मानधन दयायला तयार आहे. ज्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. आणि पुन्हा त्यामध्ये २०,०००/- रु. ची भर घालण्यास शासन तयार आहे. मात्र आमच्या कडे ५,७,९,१५ वर्षाचा शिकविण्याचा अनुभव असतांना आम्हाला मात्र अगदी तुटपूंज्या मानधनावर राबवले जात आहे. एवढे करूनही आम्हा शिक्षकांना नियमित दरमहा मानधन देण्यात येत नाही. तरी आम्हा तासिका मानधन शिक्षकांवर होत असलेला अन्याय दुर करून आमच्या खालील मागण्या मान्य कराव्यात, हि विनंती.

सत्र २०२२ – २३ चे चार महिण्याचे थकित मानधन व चालू सत्राचे आक्टोबर पर्यंतचे मानधन लवकरात लवकर काढण्यात यावे.

मागील सत्रात वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल्या नंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने तासिका मानधन शिक्षकांच्या मानधनाची तरतूद केलेली नाही, तरीही आपण चालू सत्राचे संपूर्ण मानधनाची तरतूद करुन द्यावी.

आम्हाला सुद्धा निवृत्त शिक्षकांप्रमाणेच २०,०००/- रु. सरसकट एकत्रित मानधन दर महिण्याला देण्यात यावे.

ज्याप्रमाणे खेळाडू, होमगार्ड, अंशकालीन इत्यादींना नोकरीमध्ये राखीव आरक्षण देण्यात येते, त्याचप्रमाणे तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तासिका मानधन शिक्षकांचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी होणाऱ्या पवित्र प्रणाली मध्ये तासिका मानधन शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे.